エピソード

  • कळप: सुहास शिरवळकर (नमुना प्रकरण)
    2026/06/24

    सुहास शिरवळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली 'कळप' ही कादंबरी श्वास रोखून धरायला लावणारा अनुभव आहे. भूतकाळातील सावल्या आणि वर्तमानातील गुंतागुंत यांचा अंगावर काटा आणणारा खेळ आहे. समाजाने बदनाम मानलेली पुस्तके आणि तीच पुस्तके गुपचूप वाचणारा समाज... त्या पुस्तकांचे लेखक, प्रकाशक असतात अज्ञात... वेगळ्याच विषयाची दुसरी बाजू समोर आणली आहे आपल्या लाडक्या सुशिंनी. चिरपरिचित शैली आणि एक असे रहस्य जे तुम्हाला शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडेल. प्रत्येक वळणावर मिळणारा धक्का आणि मानवी स्वभावाचे पदर उलगडणारी ही कादंबरी आजच ऐका फक्त 'स्टोरीटेल मराठी'वर संचित वर्तक यांच्या आवाजात!

    続きを読む 一部表示
    24 分
  • समथिंग: सुहास शिरवळकर (नमुना प्रकरण.)
    2026/06/10

    ‘समथिंग’ ही सुहास शिरवळकरांची भय कादंबरी म्हणजे, भयकथेचा उत्कृष्ठ नमुना म्हणायला हवी. समथिंग ऐकत असताना तुम्हाला एकाजागी खिळवून ठेवणारी हवीहवीशी वाटणारी भीती तुमच्या मनाचा ताबा कधी घेऊन, कसा विलक्षण अनुभव देऊन जाते, हे तुम्ही स्वतःच अनुभवायला हवं.

    संचित वर्तक यांच्या आवाजात ऐका, सुशि लिखीत- वेगवान भय, थरारक, रहस्यमय, उत्कंठावर्धक भय-कादंबरी ‘समथिंग’ स्टोरीटेलवर!

    続きを読む 一部表示
    1 時間
  • डिटेक्टिव्ह अल्फा आणि मखमली मोहजाल: सौरभ वागळे (नमुना प्रकरण)
    2026/06/03

    पावसाळ्यातील एक अंधारी रात्र. संदीप आपल्या कारमधून उशिरा घरी जातो आहे. वाटेत त्याला दिसते एक भिजून चिंब झालेली, साडी परिधान केलेली एक तरुण, सुंदर स्त्री. तो तिला लिफ्ट देतो, ती त्याला घरी चलण्याचा आग्रह करते. संदीपला एकूणच हा प्रकार थोडा गूढ वाटतो, पण तिच्या सौंदर्याला भाळून तो तयार होतो. ते दोघेही तिच्या घरी जातात आणि पुढे जे घडतं, त्याची संदीपने स्वप्नातही कल्पना केलेली नसते! तो एका जीवघेण्या जाळ्यात ओढला जातो. एक असं मोहजाल, जे त्याला अखेर मृत्यूच्या दारात नेऊन ठेवणार आहे. त्याच्या गळ्याभोवती सर्व बाजूंनी फास आवळला जाणार आहे. त्याला यातून वाचवू शकेल, अशी एकमेव व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे डिटेक्टिव्ह अल्फा! पण अल्फा हे कसं साध्य करेल? ऐका कृणाल आळवेच्या दमदार आवाजात, सौरभ वागळे लिखीत डिटेक्टिव्ह अल्फा कथा मालिकेतील सस्पेन्स कथा-डिटेक्टिव्ह अल्फा आणि मखमली मोहजाल!

    続きを読む 一部表示
    44 分
  • देमीन आणि काळे विश्व: संजय सोनवणी (नमुना प्रकरण)
    2026/05/27

    पृथ्वीपासून कैक प्रकाशवर्ष दूर असलेल्या जंबू ग्रहावर एक विलक्षण आणि अद्भुत सृष्टी होती. हजारो वर्षांच्या शांतीनंतर एक राक्षसी उत्पात घडवणारी काळी शक्ती द्रेकाच्या रुपात जागी झाली. तो हजारो वर्ष आधी गायब झालेले गूढ मंत्रांचे एक बाड शोधत शेवटी पोचला देमीन रहात असलेल्या अरुंद दरीतील वस्तीत. तेथून सुरु झाले भयंकर उत्पात. अद्भुताने भरलेले रहस्यमय धाडसी पाठलाग. आपल्यातही अचाट अद्भुत शक्ती आहेत ही देमीनला जाणीव झाली ती त्या शक्तीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर. द्रेकाच्या काळ्या विश्वात शिरून देमीन विजय प्राप्त करू शकला का? आपल्या ग्रहाला काळ्या शक्तीच्या तावडीतून मुक्त करू शकला का? क्षणोक्षणी अद्भुताच्या पसाऱ्यात खेचत नेणारी आणि एकाहून एक विलक्षण पात्रे असलेली सुप्रसिद्ध लेखक संजय सोनवणी लिखित (फँटसी) कादंबरी ऐका संचित वर्तक यांच्या आवाजात!

    続きを読む 一部表示
    51 分
  • अंमल: सुहास शिरवळकर (ऐका नमुना प्रकरण)
    2026/05/20

    प्रख्यात लेखक सुहास शिरवळकर यांनी रहस्य, गूढ, भय, सामाजिक, विनोदी...अशा सर्व अंगांनी लेखन केले. अंमल ही त्यांच्या वाचकांच्या पसंतीस उतरलेली एक अविस्मरणीय अनुभव देणारी भय कथा आहे. मात्र या कादंबरीत केवळ भय ही एकच भावना नसून एका बंगल्यात काही कारणाने अडकून पडलेल्या वेगवेगळ्या जोडप्यांची ती धमाल गोष्ट आहे. जी तुम्हाला भीती दाखवतानाच खळाळून हसवते सुद्धा. का, कसे? ऐका नक्की फक्त स्टोरीटेल ऍपवर. आपल्यासाठी नमुना प्रकरण येथे परी तेलंग यांच्या आवाजात मोफत. संपूर्ण कादंबरी आणि अनेक अशा कादंबऱ्या ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा स्टोरीटेल!

    続きを読む 一部表示
    20 分
  • अभिराम भडकमकर लिखित 'सीता' (नमुना: प्रकरण १)
    2026/05/13

    'सीतामाते, एक खचलेली, दीनवाणी अबला भेटेल, अशा भ्रमात मी होतो. मला भेटली एक कणखर करारी स्त्री!' ही हनुमंताला दिसलेली सीता... आणि लक्ष्मण मूर्च्छित पडल्यावर - या साऱ्या महायुद्धाला आपला सुवर्णमृगाचा मोह कारणीभूत ठरला, असं वाटून 'पार्वतीमाते, एक वेळ मला श्रीरामाच्या आयुष्यातून वजा कर, पण लक्ष्मणाचे प्राण वाचव...' असा विलाप करणारी सीता... खरंच, कशी होती सीता? विचारी आणि खंबीर? की हतबल आणि भावुक? नियतीची बळी ही सीतेबद्दलची धारणा खरी, की रामरक्षेतलं तिचं 'सीताशक्ति:' हे रूप खरं? महर्षी वाल्मिकींनी चितारलेल्या सीतेच्या विविध प्रतिमांचा समृद्ध वेध घेणारी सुप्रसिद्ध लेखक अभिराम भडकमकर यांची कादंबरी सीता, ऐका अनुपमा ताकमोगेच्या भावनापूर्ण आवाजात फक्त स्टोरीटेल ऍपवर.

    続きを読む 一部表示
    24 分
  • Detective Alpha ani madhya Ratriche Sangeet Saurabh wagle (sample) डिटेक्टिव्ह अल्फा आणि मध्यरात्रीचे संगीत सौरभ वागळे (झलक)
    2026/05/06

    नाशिक जिल्ह्यामध्ये काडवा नदीकाठी कुंदेवाडी नावाचं एक शांत- सुंदर खेडेगाव आहे. या गावाच्या बाहेर शेतांनी वेढलेल्या परिसरात सुप्रसिद्ध सतारवादक नानासाहेब रानडे यांचा बंगला आहे. चौऱ्याऐंशी वर्षांचे नाना आजही बंगल्याच्या आवारात खास बनवलेल्या आउटहाउसमध्ये नियमित सतारवादन करतात. या नियमाला अचानक एक अनपेक्षित वळण मिळतं. हिवाळ्यातील एका थंड रात्री त्या आउटहाउसमधून एकाएकी सतारीचे सूर ऐकू यायला लागतात आणि समस्त रानडे कुटूंबीयांची झोप उडते. ते आउटहाउससचा दरवाजा उघडून पाहतात आणि त्यांना समोर रक्त गोठवून टाकणारं दृश्य दिसतं - खोलीच्या मध्यभागी सतारीला कवटाळून निपचित पडलेला नानांचा मृतदेह! नानांचा खून झाला, हे सिद्ध झालं आहे. आणि अल्फाला शोधून काढायचंय, ते निर्दयपणे, थंड डोक्याने खून करणाऱ्या त्या गुन्हेगाराला. कोण असेल नानांचा खुनी? त्यांच्या कुटुंबातलाच कोणीतरी? की नानांचा एखादा अज्ञात शत्रू? संशयितांच्या गर्दीत आणखी एक प्रश्न विकट हास्य करत अल्फासमोर उभा आहे, आणि तो म्हणजे, नानांच्या मृत्यूसमयी वाजलेल्या सतारीचं रहस्य नक्की काय आहे? ऐका सौरभ वागळे लिखित 'डिटेक्टिव्ह अल्फा आणि मध्यरात्रीचे संगीत'चे एक प्रकरण मोफत कृणाल आळवेच्या दमदार आवाजातआणि पूर्ण कथा ऐकण्यासाठी स्टोरीटेल appला सबस्क्राईब करा.

    続きを読む 一部表示
    33 分